कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील सुनिता परशराम व्हन्याळकर (वय 58) यांचे मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन चिरंजीव व सुना, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड डेपोतील निवृत्त कंडक्टर परशराम व्हन्याळकर यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय सैन्य दलाचे जवान प्रवीण व्हन्याळकर, कोवाड येथील हॉटेल व्यवसायिक प्रमोद व्हन्याळकर व रणजीत व्हन्याळकर यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:
Post a Comment