कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
केबल चोरीमुळे त्रस्त झालेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांची बैठक रविवारी दिनांक ४ रोजी कुदनुर येथील सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व कृषी पंप धारक शेतकरी तसेच केबल चोरीमुळे त्रस्त असलेले शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सुखदेव शहापूरकर, अजित पवार, कुदनुर येथील सिद्धेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन पुंडलिक कोकीतकर, दूध संस्थेचे सेक्रेटरी रामचंद्र बामणे, भागोजी नागाज संजय मोरे यांनी पुढाकार घेत ही बैठक आयोजित केली आहे. कृषी पंप व केबल्स यांची सुरक्षितता राखणे आणि चोरीला गेलेल्या केबल्स या विषयावर चर्चा होणार आहे. सर्व संबंधित शेतकऱ्याने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment