के. जे. पाटील यांच्या "आघात"कथासंग्रहला 'क. सा. प.' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2019

के. जे. पाटील यांच्या "आघात"कथासंग्रहला 'क. सा. प.' पुरस्कार

कोल्हापूर येथे के. जे. पाटील आघात कथासंग्रहाला मिळालेला पुरस्कार स्विकारताना. 

कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता.चंदगड) गावचे प्राथमिक शिक्षक के. जे. पाटील यांच्या "आघात" या कथासंग्रहाला 'करवीर साहित्य परिषदेचा ' प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. श्री. पाटील यांचे लचका, तलप, आघात असे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी 'तलप' कथासंग्रहाला तीन पुरस्कार व 'चंदगड साहित्यरत्न' असे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. करवीर साहित्य परिषदेच्या या पुरस्कार वितरण सोहळा उद्योजक एम् .बी. शेख, एस्. एन्. पाटील,  साहित्यिक श्याम कुरळे, बा. ग. जोशी या संस्थेचे अध्यक्ष रा. तु. भगत, निलिमा देसाई, एम्. डी. देसाई व प्रा. किसनराव कुराडे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.




No comments:

Post a Comment