बागिलगेच्या कन्येचे नेत्रदीपक यश, राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत तेजल पाटील राज्यात दुसरी - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2019

बागिलगेच्या कन्येचे नेत्रदीपक यश, राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत तेजल पाटील राज्यात दुसरी

राष्ट्रीय संशोधन स्पर्धामध्ये उज्वल यश संपादन केलेली बागीलगेची कु . तेजल पाटील पुरस्कार स्विकारताना
तेऊरवाडी / प्रतिनिधी
ईम्यूनोशॉप इंडिया प्रा. लि. अंतर्गत राष्ट्रीयस्तर संशोधन स्पर्धा व प्रैक्टिशनर असोशिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित चौथ्या राष्ट्रीय व पाचव्या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत बागिलगेची कन्या कु. तेजल तानाजी पाटील हिने दुसरा क्रमांक पटकावला. 
तेजल मुळची बागिलगे (ता. चंदगड) येथील असून सध्या विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे बी एस सी भाग - 1 मध्ये शिकत आहे.  अकरावी पासून तिने "डेवलपिंग स्टेजस ऑफ एग " या अत्यंत क्लिष्ट विषयावर सातत्याने संशोधन केले. तिचे सातत्यपूर्ण संशोधन, कठोर परिश्रम, जिद्द याचे फलित म्हणून तिला ४ एप्रिल,२०१९ हेनरी किनस्टर, वरिष्ठ  राष्ट्रीय संशोधक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. 
या यशात तिला विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य एस. वाय. होणगेकर, प्रा. जी. डी. पाटील, प्रा अर्जुनवाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिचे वडील तानाजी पाटील हे राजीव गांधी पतसंस्था कुदनुर येथे कैशियर पदावर कार्यरत आहेत तर आई आंगणवाड़ी सेविका म्हणून बागिलगे येथे कार्यरत आहेत. एका सामान्य कुटुंबातील ग्रामीण बाज असलेल्या कन्येने राष्ट्रीय स्तरावरिल संशोधन स्पर्धेत बाजी मारल्याने तिचे तालुकाभर कौतुक होत आहे आणि संशोधन क्षेत्रातील तेजल च्या कामगिरीने तालुक्याच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे.



No comments:

Post a Comment