नांदवडे प्राथमिक शाळेचे विविध शिष्यवृत्ती परिक्षेत उल्लेखनीय यश, गुणवत्तेचा दबदबा कायम - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2019

नांदवडे प्राथमिक शाळेचे विविध शिष्यवृत्ती परिक्षेत उल्लेखनीय यश, गुणवत्तेचा दबदबा कायम

विविध परिेक्षेसाठी गुणवत विद्यार्थ्यी घडविणारे नांदवडे शाळेचे शिक्षक व तालुक्यात एकमेव ब्राँझ मेडल मिळविलेली साक्षी शिंदे
चंदगड / प्रतिनिधी

नांदवडे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यींनी गुरुकुल प्रज्ञाशोध परिक्षा, स्वच्छंद प्रज्ञाशोध परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा व जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परिक्षा या विविध परिक्षामध्ये घवघवीत यश संपादन केले. सातत्याने गेली दहा वर्षे नांदवडे शाळेने चौथी, पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परिक्षेत आपल्या गुणवत्तेची चकम दाखवली आहे.
      स्मितल गावडे    आदिती मळवीकर  अक्षता पाटील     समृद्धी पाटील       निकिता मोरे     आदर्श कुट्रे      संजोग मळवीकर      शुभम पवार     पल्लवी गावडे        साक्षी शिंदे
गुरुकुल प्रज्ञा शोध परिक्षेमध्ये इयत्ता पहिलीतील स्मितल संजय गावडे हिने तालुक्यात दुसरा तर  आदिती परशराम मळवीकर हिने तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीमध्ये अक्षता दिलीप पाटील हिने तालुक्यात प्रथम तर समृद्धी विजय पाटील तालुक्यात सहावा क्रमांक मिळविला. गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरीमध्ये निकिता नामदेव मोरे हिने तालुक्यात प्रथम, आदर्श राजेंद्र कुट्रे तालुक्यात दुसरा, संजोग संतोष मळवीकर तालुक्यात चौथा तर शुभम नारायण पवार तालुक्यात पाचवा क्रमांक पटकावला. 
       भाषा विकास व संशोधन संस्था कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेली स्वच्छंद प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शाळेतील तिसरीमधील विद्यार्थ्यींनी निकिता नामदेव मोरे 93% तालुक्यात दुसरा, संजोग संतोष मळवीकर 92% तालुक्यात तिसरा व आदर्श राजेंद्र कुट्रे याने 91% तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला. 
       ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता तिसरीमध्ये आदर्श राजेंद्र कुट्रे याने 94 टक्के गुण मिळवत ऑल इंडिया रॅकमध्ये 20 वा क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळविले. संजोग संतोष मळवीकर याने 93% गुण मिळवत ऑल इंडिया रॅक 33 वा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळविले.  निकिता नामदेव मोरे 90 टक्के, शुभम नारायण पवार 86 टक्के व पल्लवी प्रशांत गावडे 86 टकक्के गुण मिळवत सिल्वर मेडल मिळविले. 
       सातवीसाठी घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये साक्षी जयवंत शिंदे हिने तालुक्यात एकमेव ब्राँझ मेडल मिळविले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेतसुध्दा सातवीमधील साक्षी जयवंत शिंदे हिने 154 गुण मिळवत तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. 
      दोन वर्षापूर्वी  डिजिटल शाळा होण्याचा मान मिळbfणाऱ्या या शाळेने गुणवत्तेचे सोबत क्रीडा व सांस्कृतिक विभागातही आपला ठसा उमटवला आहे. ई-लर्निंग पद्धतीने शिक्षण, मुलींचे झांजपथक सादरीकरण, निसर्गसंपन्न परिसर, यासारखी वैशिष्ट्ये जपणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत गुढीपाडव्यापासून मोफत प्रवेश सुरू झाल्याचे  सांगण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना आसावरी बल्लाळ, सरीता इंगळे, ममता पेडणेकर, आर. एन. पाटील, शिवाजी पाटील, बाबुराव गावडे, संदिप म्हाडगुत, वैजनाथ देसाई, मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी केंद्रप्रमुख सुभाष सावंत, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम पवार व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.




No comments:

Post a Comment