भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी महीला आघाडी पदधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2019

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी महीला आघाडी पदधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या राष्ट्रीय महिला नेत्या अंजलीताई आंबेडकर,  वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा रेखाताई ठाकुर,  राज्य संघटीका अरुंधती सिरसाठ व पश्चिम महाराष्ट्र सहनिरिक्षक निर्मला वनशिव या कोल्हापूर जिल्हा महीला आघाडी बांधणीसाठी कोल्हापुर दौर्यावर आल्या होत्या. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे नियोजन प्रियाताई शिरगावकर, प्रा. मिनल राजहंस, डॉ. अरुणा माळी यांनी केले. याकामी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. इंद्रजीत कांबळे,  जिल्हा प्रवक्ता प्रा. कपिल राजहंस,  निर्मिती विचारमंचचे मा. अनिल म्हमाणे, नानासाहेब भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी भारिपचे दत्ता मिसाळ (जिल्हा उपाध्यक्ष), सतिश माळगे (जिल्हा युवाध्यक्ष), प्रविण आजरेकर (युवा शहराध्यक्ष), विनोद कांबळे (करवीर, सचिव) बाबासाहेब मांडुकलीकर (गगनबावडा, युवाध्यक्ष), किरण कांबळे (को. जिल्हा आयटी प्रमुख), ज्योती ढाले,  मंगल कांबळे, स्मिता कांबळे,  करुणा कांबळे,  रुपाली कांबळे,  राणी सोनोने, सुनिता कांबळे (गगनबावडा), आक्कताई फाळके,  पुनम सु़ळगावकर, डॉ. प्रिती कांबळे,  संगीता कांबळे (चंदुर),  छाया कांबळे,  संपदा मुळेकर, अनिता गवळी,  ज्योती डोंगरे व जिल्ह्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment