चंदगड येथे विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थींना गणवेश आणि शालेय साहित्य वाटप करताना विद्यालय व उगम फौंडेशनचे पदाधिकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
समाज जसा घडत असतो तसा बिघडत सुध्दा असतो. पण उगम फौंडेशनसारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेमूळे समाजात स्थिरता प्राप्त होते. त्यामूळेच उगमचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक भान असणारी माणसेच समाजात मोठी होतात असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती बबनराव देसाई यांनी केले. चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व उगम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थाचा सत्कार आणि विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थींना गणवेश आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सौ. व्ही.आर. बांदिवडेकर होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही.जी. तुपारे यांनी केले. सौ. बांदिवडेकर म्हणाल्या, ``सद्या विद्यार्थी, पालक, शिक्षक परीक्षेतील गुणांच्या मागे धावत आहेत. त्यामूळे विद्यार्थी ज्ञानार्थी न बनता परीक्षार्थी बनत चालला आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परीक्षेतील गुणापेक्षा संस्काराचे गुण महत्वाचे असल्याचे सांगितले.`` 'समाजामूळे आपल व्यक्तीमत्व घडत असतं त्यामूळे प्रत्येकाने समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सभापती बबनराव देसाई यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थाचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित गायचारे यांच्या स्मृतिपित्यर्थ उगम फौंडेशनमार्फत विद्यालयातील तीस गरीब व होतकरू विद्यार्थांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कु. मानसी कांबळे, एम. व्ही. कानूरकर, टी. टी. बेरडे, सुहास रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला पर्यवेक्षक एस. आर. देवण, एम. एस. मुळीक, पी. बी. गुळामकर, एस. जी. सातवणेकर, प्रबुध्द सिरसाठ, अमित पाटील, प्रसाद बुरूड, विनायक सुतार, शुभम पाटील, नयीम सयद, ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार टी. एस. चांदेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment