चंदगड तालुक्यातील माणगाव- लाकुरवाडी मार्गावर रस्त्यावर आलेली काजूची झाडे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. |
माणगाव / प्रतिनिधी
माणगाव (ता. चंदगड) ते लाकुरवाडी-सोनारवाडी रस्त्याच्या दुतर्फा खाजगी काजू झाडे रस्त्यावर आल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना समोर येणारे वाहन दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. संबधीत विभागाने या झाडांच्या फांद्या तोडून रस्ता रुंदीकरन करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
माणगाव ते लाकुरवाडी, सोनारवाडी मार्गे अडकूर हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरुन अनेक प्रवाशी खासगी वाहनाने जा-ये करतात. पण माणगाव पासून काही अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूना मोठ्या प्रमाणात काजूची झाडे रस्त्यावर आली आहेत. हि झाडे जरी शेतकऱ्यांच्या हद्दीत असली तरी त्यांच्या फांदया या रस्त्यावर आल्या आहेत. या झाडापासून शेतकऱ्यांना काजूचे उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी रस्त्यावरील फांदया तोडत नाहीत. या फांदयामुळे अर्धा अधिक रस्ता व्यापून गेला आहे. रस्ता अरूंद झाल्याने समोरुन येणाऱ्या वाहनधारकाला साईड देताना अपघात होत आहेत. अवजड वहाने या झाडामध्ये अडकून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. एखादया मोठया अपघाताची वाट न पहाता संबधीत विभागाने या झाडांच्या फांदया तोडून रस्त्यावरील अडथळा दूर करण्याची मागणी वाहनधारकांतून जोर धरत आहे. सद्या पावसाळा सुरु असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी आहे.
No comments:
Post a Comment