कालकुंद्री ग्रामपंचायत निवडणुकीत कल्मेश्वर ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व, सर्वच जागा जिंकत मिळविले बहुमत - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2019

कालकुंद्री ग्रामपंचायत निवडणुकीत कल्मेश्वर ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व, सर्वच जागा जिंकत मिळविले बहुमत

    विनायक कांबळे          सुरेश नाईक               ईश्वर वर्पे              पांडुरंग गायकवाड
      संगीता पाटील     उमा मुर्डेकर         लक्ष्मी नाईक        गीता नाईक   अनिता तेऊरवाडकर


चंदगड / प्रतिनिधी 
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरपंच विरोधी कल्मेश्वर ग्रामविकास आघाडीने सर्वच नऊ जागा जिंकत शिवशाही पॅनेलवर एकतर्फी विजय मिळवला.
सरपंचांच्या मनमानीला विरोध करत ११ पैकी 9 सदस्यांनी अविश्वास ठराव आणला व तो मंजूर झाला. एवढे करूनही सरपंच बदला बाबत कार्यवाही होत नाही हे पाहून संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होऊन पुन्हा निवडणूक लागेल या आशेने नऊ सदस्यांनी राजीनामे दिले. पण ग्रामपंचायत बरखास्त झाली नाही. राजीनाम्यामुळे रिक्त जागी पोटनिवडणुक लागली होती. त्यामुळे सरपंच समर्थक वगळता गावातील सर्वच गट एकत्र येऊन कल्मेश्वर ग्रामविकास आघाडीने नव्याने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. यात कल्मेश्वर आघाडीच्या मागास प्रवर्गातील स्‍त्री राखीव उमेदवार लक्ष्मी पुंडलिक नाईक व गीता शिवाजी नाईक या बिनविरोध निवडून आल्या होत्या. निवडणूक लागलेल्या सात जागांसाठी एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. यातील कल्मेश्वर आघाडीचे सातही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. 
कालकुंद्री येथील शिवाजी चौकात विजयानंतर जल्लोष करताना उमेदवार व त्यांचे समर्थक.
निवडणूक निकालानंतर चंदगड येथे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. कलमेश्वर आघाडीच्या विजयाचे एम. जे. पाटील, अशोक रामू पाटील, गजाभाऊ पाटील, शिवाजी कोकीतकर, सुरेश नाईक,  जे. एस. पाटील आदी शिल्पकार ठरले. अनुसूचित जाती पुरुष साठी आरक्षित सरपंच पदासाठी आघाडीने खुल्या गटातून जिद्दीने निवडून आलेल्या विनायक कांबळे यांची वर्णी लागेल काय? याकडे समर्थकांचे लक्ष असून तसे प्रयत्न सुरू आहेत. गावातील संवेदनशील व तणावपूर्ण परिस्थिती पाहता कोल्हापूरहून अतिरिक्त फौज फाटा कालकुंद्री येथे तैनात करण्यात आला आहे. दरम्यान कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. 23) ला मतदान झाले होते. मात्र प्रभाग क्रमांक एकमध्ये एव्हीएम मशीन बंद पडल्याने पुन्हा काल 27 ला मतदान घेण्यात आले. आज संपुर्ण नऊही जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये कल्मेश्वर आघाडीने सर्व नऊ जांगावर एकतर्फी विजय मिळविला. 
प्रभाग उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक ना मा प्रवर्ग पुरुष सुरेश  सटुपा नाईक ३४६ विजयी विरुद्ध हनुमंत रमेश नाईक १४८, सर्वसाधारण पुरुष- पांडुरंग कलाप्पा गायकवाड २८९ विजयी विरुद्ध संभाजी राणबा पाटील १७७, विनायक धोंडीबा पाटील २९, सर्वसाधारण स्त्री - संगीता कल्लाप्पा पाटील ३६४ विजयी विरुद्ध उज्वला मारुती सावंत १३३,प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण पुरुष- विनायक पुंडलिक कांबळे २४२ विजयी विरुद्ध प्रकाश कल्लाप्पा पाटील १२७, प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण पुरुष - ईश्वर लक्ष्मण वरपे २५४ विजयी विरुद्ध शंकर रामा कोकितकर १५२, नागेंद्र पुंडलिक पाटील ६५, सर्वसाधारण स्त्री - अनिता अनिल तेऊरवाडकर २३५ विजयी विरुद्ध नम्रता परशुराम पाटील २२७. प्रभाग क्रमांक चार सर्व साधारण स्त्री - उमा शंकर मुडेकर २७८ विजयी विरुद्ध पूजा गुरुनाथ पाटील २५७.

No comments:

Post a Comment