नरेवाडीतील सहा पोलिस अधिकारी आज एकाच दिवशी सेवानिवृत्त - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2019

नरेवाडीतील सहा पोलिस अधिकारी आज एकाच दिवशी सेवानिवृत्त


नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील एकाच दिवशी सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी.
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
चंदगड - गडहिंग्लज तालुक्यातील काही गावे विविध क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. कालकुंद्री गाव शासकिय अधिकाऱ्यांसाठी, तेऊरवाडी गाव सैन्यदलासाठी, किणी - हुंदळेवाडी कब्बडीसाठी तर गडहिंग्लज मधील नरेवाडी पोलिस अधिकाऱ्यांसाठी  प्रसिद्ध आहे. आज या नरेवाडी गावातील सहा पोलिस अधिकारी एकाच वेळी सेवानिवृत्त झाले.एकाच वेळी एकाच गावातील एवढे आधिकारी निवृत्त होण्याची हि पहिलीच वेळ आहे. 
नरेवाडी येथील विजय कदम (पो. सह. आयुक्त), दयानंद चौगुले (पोलिस निरीक्षक), सिताराम येसणे (पो. उप निरीक्षक), आप्पा कदम (सहा. पो. उपनिरीक्षक), गोपाळ मांगले (पो. हे. कॉन्स्टेबल) हे सर्व अधिकारी आज 30 जून 2019 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रामाणिकपणे सेवा करून हे सर्व अधिकारी एकाच दिवशी निवृत्त होत असल्याने या सर्व अधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

No comments:

Post a Comment