दिपक पाटील व ज्योती पाटील |
बसर्गे (ता. चंदगड) येथील रहिवाशी व जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती ज्योती दिपक पाटील व गोकुळचे विद्यमान संचालक दिपक भरमु पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 4 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगपती शामराव बेनके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याला माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी जि. प. सदस्य के. जी. नांदेकर, सभापती बबनराव देसाई, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती शांताराम पाटील, मलगोंडा पाटील, मनिषा शिवनगेकर, ॲड. अनंत कांबळे, जगन्नाथ हुलजी यांच्यासह सर्व आजी-माजी जि. प. व पं. स. सदस्य सरपंच उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित रहावे असे आवाहन प्रताप सुर्यवंशी व अशोक कदम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment