![]() |
माणगांव ते शिवणगे रस्त्यावर बेसुमार वाढलेली ही झुडपे अपघातांना आमंत्रण देत आहेत. |
माणगाव ते शिवणगे (ता चंदगड) गावांदरम्यान रस्त्यानजीक वाढलेल्या झुडपांमुळे रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. ही झुडपे काढण्याची मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावरील पाटणे फाटा ते कोवाड, दड्डी, हत्तरगी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. गत वर्षभरात पाटणे फाटा ते कोवाड पर्यंत रस्ता रुंदीकरण व नवीन डांबरीकरण झाले असले तरी केवळ माणगाव ते शिवनगे रस्त्याचे काम रखडले आहे. मुळातच हा रस्ता अरुंद असून वळणावर डांबरी रस्त्याच्या आतपर्यंत झुडपे वाढली आहेत. डांबरी रस्त्याच्या बाजू पट्ट्या खचल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहने खाली घेताना अपघात घडत आहेत. तर वळणामुळे समोर येणारे वाहन दिसत नसल्याने गोंधळलेले अनेक दुचाकीस्वार व मागे बसलेल्या महिला या ठिकाणी पडून जखमी झाले आहेत .पावसाळा सुरू होताच झुडपे पुन्हा जोमाने वाढणार आहेत .तत्पूर्वी संबधीत बांधकाम विभागाने ते जेसीबीच्या साहाय्याने मुळांसकट काढून संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा, अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment