चंदगडमधील निट्टूर येथे लोकसभेतील विजयाबद्दल शिवसैनिकांनी फडकावला ७५ फुटी भगवा ध्वज - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2019

चंदगडमधील निट्टूर येथे लोकसभेतील विजयाबद्दल शिवसैनिकांनी फडकावला ७५ फुटी भगवा ध्वज

 निटुर (ता. चंदगड)  येथे शिवसेनेच्या विजयाबद्दल फडकलेला ७५ भगवा ध्वज
चंदगड / प्रतिनिधी
शिवसेनेने कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेच्या दोन्ही जागा प्रथमत जिंकून अभूतपूर्व यश संपादन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कित्येक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरवले व जिल्हा भगवामय केला त्याबद्दल निटूर (ता. चंदगड) शिवसेना शाखेच्या वतीने ७५ फूट उंचीचा भगवा ध्वज फडकवण्यात आला . शिवसैनिक व नागरिकांच्या देणगीतून येथील भगवा चौकात फडकवलेला हा भगवा जिल्ह्यातील सर्वात उंच असल्याचा दावा शाखेच्यावतीने केला आहे. शाखाप्रमुख अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नवनिर्वाचित शिवसेना खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेले लोकाभिमुख समाज कार्य घडावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी भगवा चौक अध्यक्ष आकाश पाटील, प्रवीण पाटील, दत्ता पाटील, आकाश जोशी, सचिन पाटील ,चेतन पाटील, सुशांत पाटील, गजानन पाटील, प्रथमेश पाटील, निशांत मरणहोळकर, श्रीधर मुडेकर, रवी पाटील,पी जी पाटील, श्रावण पाटील आदींची उपस्थिती होती.No comments:

Post a Comment