चंदगड तालुक्यातील प्रवीण गावडे यांची इंग्लंड येथील क्रिकेट लीग साठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2019

चंदगड तालुक्यातील प्रवीण गावडे यांची इंग्लंड येथील क्रिकेट लीग साठी निवड

प्रवीण गावडे
 मजरे कारवे /  प्रतिनिधी
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालय व गुरु म भ तुपारे ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी प्रवीण मारुती गावडे याची इंग्लंड येथील नॉर्थ सॉमरसेट क्रिकेट लीग साठी अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थीदशेतच प्रवीण गावडेने भालाफेक या प्रकारात देदीप्यमान यश संपादन केले होते. राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी ॲथलिट म्हणून त्याने नावलौकिक मिळवला होता.
मे 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान नॉर्थ सॉमरसेट क्रिकेट लीग, लंडन येथे खेळविण्यात येणार आहे. प्रवीण गावडे लीगमध्ये ब्रिस्टॉल ग्लाडीएटर्स क्रिकेट क्लब या संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून या स्पर्धेत खेळणार आहे. या निवडी निमित्त महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एस व्ही गुरबे व शालेय समितीचे चेअरमन एम एम तुपारे यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण गावडे यांचे वडील खेडूत शिक्षण मंडळामध्ये एक उत्कृष्ट इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. प्रवीण याला विद्यालयाचे माजी क्रीडाशिक्षक ए जी हारकारे, प्रकाश बोकडे, पी एस सावगावे, भारत गावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रविण गावडे हा अशा प्रकारची निवड झालेला चंदगड तालुक्यातील पहिलाच खेळाडू आहे. तालुक्याच्या वैभवात भर घालणारी हि निवड आहे. त्यामुळे प्रवीण चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment