तेऊरवाडी येथील दयानंद पाटील अमेरिकेच्या जागतिक परिषदेमध्ये होणार सहभागी - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2019

तेऊरवाडी येथील दयानंद पाटील अमेरिकेच्या जागतिक परिषदेमध्ये होणार सहभागी

दयानंद पाटील
तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी ता . चंदगड येथील प्रतिथयश विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील हे अमेरिका येथील मियामी बिच (फ्लोरिडा) येथे ९ ते १२ जून रोजी संपन्न होत असलेल्या एमडीआरटी जागतिक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना होत आहेत. गडहिंग्लज उपविभागातून या परिषदेसाठी सहभागी होणारे ते एकमेव विमा सल्लागार आहेत .विमा क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्यामूळे अनेक वेळा एम. डी. आर. टी. पुरस्काराने त्याना सन्मानित करण्यात आले आहे. श्री पाटील याना वरिष्ठ शाखाधिकारी अशोक कल्याणकर , विकास अधिकारी अरूण उबाळे , क्रिएटिव्ह गृप ऑफ गडहिंग्लज यांचे मार्गदर्शन लाभले. तेऊरवाडी ग्रामस्थांचा वतीने त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment