चंदगड आगारात 'एस. टी.'चा ७१ वा वर्धापन दिन साजरा
आगारप्रमुख श्री. हवालदार म्हणाले, `` गेल्या तीन वर्षात एकही नवीन बस मिळाली नसली तरी तोटा सहन करून विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजसाठी बस सोडल्या आहेत. तरीही बस संख्या ३८ वरून ५४ पर्यंत नेली आहे. त्या ३६५ फेऱ्यातून रोज २१ हजार किमी धावतात. तरीही अनेक कारणांनी आगार तोट्यात असल्याचे त्यांनी नमुद केले. यावेळी आगारातील गौतम गाढवे, पंकज पाटील, आयुब मुल्ला, बी. एल. पाटील, संजय पाटील आदी अधिकाऱ्यांसह सर्व वाहक-चालक, कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कपिल मुंडे यांनी केले. आभार राजेश्वर जाधव यांनी मानले.
![]() |
चंदगड ए. टी. आगाराच्या वर्धापनदिन कार्यक्रमप्रसंगी बोलताना जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, शेजारी बाबुराव हळदणकर, विजय हवालदार, दयानंद काणेकर, विजयकुमार दळवी आदी. |
चंदगड / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत एस. टी. चा सिंहाचा वाटा आहे. शाळा कॉलेजला ये-जा करण्यासाठी प्रत्येकाकडे स्वतःची वाहने नसतात. अशा लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचविण्याचे काम एसटीने गेली अनेक वर्षे सवलतीच्या दरात करून देशाचे आधारस्तंभ घडविले असे गौरवोद्गार जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी काढले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी राज्य परिवहन मंडळाची एस. टी. च्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त चंदगड आगार मार्फत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय हवालदार होते.
प्रास्ताविक कपिल मुंडे यांनी केले. श्री. बल्लाळ म्हणाले, ``एसटी कर्मचाऱ्यांचे पगार व वेतनवाढी तुटपुंज्या आहेत, त्या वाढल्या पाहिजेत. चंदगड आगाराच्या ऊर्जितावस्थेसाठी आपण परिवहन मंत्र्यापर्यंत जाऊ असे सांगितले. माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर यांनी पावसाळ्यापूर्वी गळक्या बस दुरुस्त करण्याची सुचना मांडली. यावेळी पं. स. सदस्य दयानंद काणेकर म्हणाले, ``संप, मोर्चा, आंदोलन प्रसंगी एसटी फोडून नुकसान करणे हे चुकीचे आहे. यावेळी पत्रकार श्रीकांत पाटील, कामगार संघटना अध्यक्ष बाळासाहेब चौकुळकर, राजू बोलके, प्रा. डी. के. कदम आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी चंदगड-सातारा या सजवलेल्या एसटी बस समोर शहीद जवानांचे वीर माता - पिता व पत्नी यांच्या हस्ते पूजन करून केक कापण्यात आला. श्रीमती शोभा पाटील, शर्मिला तुपारे, शोभा ओऊळकर, सुवर्णा कदम, कमळाबाई मणगुतकर, लक्ष्मी भोगण, कल्पना कुंभार, सुवर्णा कंकणवाडी, रूपाली तुपारे, कावेरी आवडण, सरस्वती मडिलगेकर आदींचा समावेश होता.
![]() |
एस. टी. च्या वर्धापनदिनी पूजन प्रसंगी मान्यवरांसह वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. |
No comments:
Post a Comment