![]() |
किल्ले पारगड |
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पारगड (ता. चंदगड) येथे बुधवार (ता. 5) व गुरुवार (ता. 6) जून 2019 या कालावधीत मजरे कारवे येथील शहीद जवान वेलफेयर फौउंडेशन व पारगड ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दुसरा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती फौउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग बेनके यांनी दिली.
या सोहळ्याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, जिल्ह्यातून तसेच सीमाभागातून शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. राज्याभिषेक सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न असून तालुक्यात पारगड कलानंदिगड गंधर्वगड आणि महिपाळगड असे चार किल्ले भक्कम उभे असून शिवरायांची आठवण करून देतात. पारगड किल्ला हा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. या किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांचे वंशज आजही किल्ल्यावर आहेत. शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना दिलेली समुद्री कवड्याची माळ आजही वंशज शितल मालुसरे यांच्याकडे आहे. अशी शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर यावर्षी प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे यांच्या परवानगीने आयोजित करण्यात आला आहे. लाखो शिवभक्त या दिवशी रायगडावर दाखल होतात. मात्र चंदगड वासियांना रायगड खूपच लांब पल्ल्याचा असल्याने जाणे शक्य होत नसल्याने पारगडवर राज्याभिषेक या वर्षी साजरा होणार आहे. रायगड नंतर पारगडला दुसरा मान मिळाला आहे. दिनांक 5 रोजी मजरे कारवे येथून दिंडी पालखीने सुरुवात होणार आहे. पारगडवर दुपारी 1 ते 3 यावेळेत स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तीन ते पाच या वेळेत गड सजावट पाच ते सहा या वेळेत गडपूजन आणि सहा ते साडेसात वाजेपर्यंत शिवकालीन युद्ध कलांचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. साडेआठ ते रात्री दहापर्यंत मशाल फेरी साडे दहा वाजल्यापासून गड जागरण पोवाडे व गोंधळ गीते साजरी केली जाणार आहेत. दिनांक 6 रोजी पहाटे साडेपाच ते साडेसात या वेळेत काकड आरती व समाधीचे पूजन होणार आहे साडेसात ते नऊ या वेळेत ध्वजारोहण भंडारा उधळत व शस्त्रपूजन त्यानंतर नऊ ते साडे नऊ या वेळेत गंधर्वगड, महिपाळगड, कलानंदिगड, मजरे कारवे या गावच्या पालख्यांचे आगमन व मिरवणूक होणार आहे. साडेनऊ ते अकरा या वेळेत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. अकरा ते साडेबारा या वेळेत मान्यवरांची गड संवर्धनाविषयी मनोगते सादर केली जाणार आहेत. शिवभक्तांनी कार्यक्रमाला येताना गांधी टोपी किंवा भगवी टोपी भगवा फेटा आणि शुभ्र कपडे परिधान करून वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीने केले आहे.
No comments:
Post a Comment