शिवसेनेच्या वतीने किल्ले पारगड प्रदक्षिणा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2019

शिवसेनेच्या वतीने किल्ले पारगड प्रदक्षिणा संपन्न

किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे पारगड प्रदक्षिणा कार्यक्रमाच्यावेळी शिवसेनेचे संजय पवार, संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे गडाच्या प्रदक्षिणेला पारगडच्या पायथ्यापासून सुरुवात सकाळच्या सत्रात प्रारंभ झाला. पारगड प्रदक्षिणा या कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विजय देवणे होते. शिवसेना व हिल रायडर्स फौंडेशन, सामीट ऍडव्हेंचर्स, किल्ले पारगड ज्ञानकल्याण संस्था पारगड व संवेदना सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने पारगड प्रदक्षिणा पहीली मोहीम यशस्वी झाली.
या प्रदक्षिणा मोहिमेची सुरुवात भगवा झेंड दाखवून उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संजय पवार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर, प्रा. सुनील शिंत्रे, प्रतिक क्षीरसागर, प्रताप पाटील, अनिल दळवी, विशाल गायकवाड, प्रमोद पाटील, विनोद कांबुस,  चंदन मिरजकर, युवराज साळोखे, प्रसाद अडनाईक, सौ. शांता जाधव, सौ. श्वेता नाईक आदी उपस्थित होते. या पारगड प्रदक्षिणा सोहळ्यामध्ये तीनशेहून अधिक युवकांनी सहभाग घेतला. किल्ले पारगड प्रदक्षिणा तीन तास चालली. आम्ही किल्ले पारगडच्या  विकासाठी कटिबद्ध आहोत असे मत यावेळी विजय देवणे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment