नेसरी येथे मोफत मेंदूविकार तपासणी शिबीरामध्ये 125 रुग्णांची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2020

नेसरी येथे मोफत मेंदूविकार तपासणी शिबीरामध्ये 125 रुग्णांची तपासणी

नेसरी येथे शिबाराचा लाभ घेणारे लाभार्थी.
नेसरी / प्रतिनिधी
नेसरी  येथील डॉ. संतोष मोरे (फॅमिली फिजिशियन व सर्जन) यांच्या न्यूलाईफ जनरल  हॉस्पिटल व  गडहिंग्लज येथील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉ. किरण पाटील (मेडुल्ला हेल्थकेअर, डॉक्टर कॉलनी, गडहिंग्लज)  यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जानेवारी २०२० रोजी मोफत मेंदूविकार तपासणी शिबीर घेण्यात आले. नेसरी व नेसरी पंचकृषीतील जवळपास १२५ लोकांनी या शिबीराचा लाभ घेतला. लकवा, आकडी, अर्धशिशी, झोपेच्या तक्रारी, विसरभोळेपणा, कापरा आदी रोगांनी त्रस्त लोकांनी आपले चेकअप करून, पुढील उपचाराचे मार्गदर्शन घेतले. आपल्याला अशी लक्षणे जाणवल्यास वेळ न दवडता, मेंदूविकार तज्ज्ञांचा सल्ला वेळेत घ्यावा जेणेकरून पुढील होणारे त्रास, पैसा, वेळ इत्यादी सर्व वाचू शकते असा सल्ला डॉ. किरण पाटील यांनी दिला. डॉ. संतोष मोरे व त्यांच्या न्यूलाईफ जनरल हॉस्पिटल नेसरी येथील संपूर्ण टीमने यासाठी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment