![]() |
ज्ञानेश्वर कांबळे गौतम कांबळे |
लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथून चंदगडला येत असताना पोलिस कॉटर्सजवळ मोटरसायकलवरील ताबा सुटून मोटरसायकल रस्त्याकडेच्या झाडाला आदळून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर मनोहर कांबळे (वय-23) व गौतम भगवान कांबळे (वय-22, दोघेही रा. लक्कीकट्टे, ता. चंदगड) अशी मयतांची नावे आहेत. शनिवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला. अरुण कांबळे यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे.
यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी – ज्ञानेश्वर व गौतम हे स्लेन्डर मोटरसायकलने (एम एच 09, ई व्ही, 0561) लक्कीकट्टेहून रात्री दहाच्या दरम्यान कामानिमित्त चंदगडला येत होते. चंदगड पासून काही अंतरावर असलेल्या पोलिस कॉटर्सजवळ आले असता भरधाव वेगाने असलेल्या मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकलची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोराची धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, या धडकेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून सहाय्यक फौजदार श्री. मुजावर तपास करत आहेत. ज्ञानेश्वर याचे वडील हलकर्णी येथील महाविद्यालयात शिपाई म्हणून नोकरीला आहेत. ज्ञानेश्वर हा उत्कृष्ट तबलावादक होता.
No comments:
Post a Comment