चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातून बुधवारपासून बसफेऱ्या सूरू - अभियंता संजय सासणे - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2020

चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातून बुधवारपासून बसफेऱ्या सूरू - अभियंता संजय सासणे

तिलारी घाटाचे संग्रहित छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे तिलारी घाटातील रस्त्याकडेला असलेली दरड 6 जुलै 2019 रोजी कोसळून रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक गेली सहा महिने ठप्प झाली होती. गेले तीन महिने या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरु होते. प्रवाशांच्या मागणीनुसार व भविष्याचा विचार करुन रस्ता वाहतुकीला योग्य बनविला आहे. या घाटातून बस वहातूक सुरू करावी याबाबतचे पत्र बांधकाम विभागाने चंदगड आगारप्रमुखाना दिल्याची माहिती बांधकामचे अभियंता संजय सासणे यानी दिली. त्यानुसार बुधवार आठ जानेवारी 2020 पासून हा रस्ता वाहतुकीला खुला होणार आहे.
तिलारी घाट हा गोव्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरुन जाताना नागमोडी वळणाचा तिलारी घाट पार करावा लागतो. यावर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी घाटातील रस्त्याकडेला असलेली दरड 6 जुलै 2019 रोजी कोसळून रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक गेली सहा महिने ठप्प झाली होती. तिलारी वीज प्रकल्पात काम करणरे बहुतांशी कर्मचारी हे तिलारीनगर येथे राहतात. या कर्मचाऱ्यांना विज प्रकल्पात नोकरीसाठी दोडामार्ग सावंतवाडी मार्गे  आंबोलीतून चंदगड व नंतर तिलारीला यावे लागले होते. बेळगाव व चंदगड हून गोव्याला जाणारा तिलारी हा जवळचा रस्ता असल्याने या घाटातून  मोठ्या प्रमाणात वहातूक असते. पण  या घाटातील   सर्वच वहातूक थांबणेत आल्याने वहातूक इसापूर-चौकूळ-आंबोलीमार्गे, चंदगड-कानूरमार्गे  बेळगाव मार्गे सूरू होती. यामुळे वाहनधारक प्रवाशांना चार महिने  वेळ  पैशाचा भुर्दड सहन करावा लागला होता. पण आता घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने आठ जानेवारी 2020 पासून अधिकृत बस फेऱ्या सुरू होणार आहेत.

No comments:

Post a Comment