जोतिबा पाटील |
कोवाड (ता. चंदगड) बाजारपेठेतील उघोगपती साईश्याम स्टील सेंटर चे मालक ह. भ. प. श्री अरूण जोतिबा पाटील यांना राजश्री छत्रपति शाहू राष्ट्रिय विचार साहित्य संमेलन कडून दिला जाणारा महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीमंत नारायण घोरपड़े नाट्यगृह, इचलकरंजी येथे 5 जानेवारी 2020 रोजी समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. कर्यात भागामध्ये सामाजिक काम करत उद्योग व्यवसायात गरुड़ भरारी घेऊन त्यानी आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment