तावरेवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
 |
तावरेवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना पदाधिकारी. |
कार्वे / प्रतिनिधी
तावरेवाडी (ता. चंदगड) येथे मराठी विद्या मंदीर व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अक्षता कागणकर, सदस्या सुमन बळजकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक दिपक मणगुतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रामसेवक महाशिध्द हाके, उपसरपंच सटूप्पा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष मारुती कगनकर, गणपतराव खणगुतकर, तानाजी पाटील, राम कागणकर, तानाजी कागणकर, सटूप्पा कागणकर, आरती कागणकर, उत्तम चांदेकर, संभाजी कागणकर, वसंत कागणकर, साताप्पा पाटील, मंगल पाटील आदी उपस्थित होते. स्वप्नाली पाटील यांनी आभार मानले.
 |
निट्टूर (ता. चंदगड) येथे सावित्रीबाई जयंती कार्यक्रम झाला. |
निट्टूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
स्त्री शिक्षणाचा पाया रचुन स्त्रिया साठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या थोर समाजसेविका आणि पहिल्या वाहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत निट्टूर ता. चंदगड येथे मोठ्यां उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच श्री अरुण सुतार होते,प्रास्ताविक ग्रामसेवक भरत कापसे यानी केले.प्रतिपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली,यावेळी ग्रामसंघाच्या सचिव सौ नम्रता पाटील, श्रीमाता बचत गटाच्या सचिव सौ सुरेखा पाटील,लक्ष्मी बचत गटाच्या भारती पाटील, सचिव रूपा पाटील व सी आर पी सौ राजश्री जाधव यांची मनोगते झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या गीता बामने,शांता पुजारी,रेखा पाटील,पदमा पाटील, मनीषा पाटील,स्वाति पाटील यांच्या सह बचत गटातील सदस्या उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment