कोवाड (ता. चंदगड) येथे बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न. |
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न झाला. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै.पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख वाय आर निटुरकर उपस्थित होते. प्रमुख वक्त्या भावना अतवाडकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संपुर्ण जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थी सिद्धार्थ मनवाडकर, मल्हार बुरुड, रणवीर व्यवहारे, पियुशा यादव, ओमकार परशराम पाटील, हर्षदा होन्याळकर, सुहानी भोगण, अथर्व जाधव, ऋतुजा भोगण, रचना खोराटे यांच्या सह अध्यापक गणपत लोहार, केंद्रप्रमुख निटूरकर उज्वला नेसरकर यांची भाषणे झाली. कविता पाटील यांनी सुत्रसंचालन केले. श्रीकांत आप्पाजी पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment