पाटणे फाटा येथे सरकारच्या कर्जमाफी निर्णयाविरोधात सोमवारी रास्ता रोको आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2020

पाटणे फाटा येथे सरकारच्या कर्जमाफी निर्णयाविरोधात सोमवारी रास्ता रोको आंदोलन

चंदगड पोलिस ठाण्यामध्ये रास्ता रोको आंदोलनाची प्रत देताना भिमराव चिमणे, विठोबा गावडे, गणेश फाटक.
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी मुक्ती योजना ही फसवी असून प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सोमवारी 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती भिमराव चिमणे यांना दिली. 
कर्ज काढून नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकरी हे आपले उत्पन्न कमी असले तरीही उसनवार करून आपले कर्ज फेडून व पुन्हा कर्ज घेतात. महाराष्ट्र सरकारने आता कर्जमुक्ती योजना आणली आहे, याचा फायदा काही अंशी शेतकऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्र सरकारने सरसकट थकबाकीदार व चालू कर्जदारांना दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमुक्ती द्यावी. महाराष्ट्रामध्ये महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. सर्वच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची गरज आहे. तेव्हा या सरकारी कर्जमुक्ती निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे चेअरमन संचालक व शेतकरीही विकास सेवा संस्था समिती चंदगड तालुका यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर महादेव प्रसादे, विठोबा गावडे, नारायण पाटील व गणेश फाटक यांच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment