सरसकट कर्जमाफी चंदगड तालुक्यात कडकडीत बंद, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विविध संघटनांच्या संपालाही प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2020

सरसकट कर्जमाफी चंदगड तालुक्यात कडकडीत बंद, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विविध संघटनांच्या संपालाही प्रतिसाद

कोवाड (ता. चंदगड) येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करुन शांततेत बंद पाळण्यात आला. 
चंदगड / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी हि बुडव्यांना फायदेशीर असून प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या बंद चंदगड तालुक्यातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. बँका, महसुल, अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, विविध शेतकरी संघटना आदी 265 संघटनांनी पुकारलेल्या बंदला चंदगड तालुक्यातून बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अंगणवाडी सेविका व प्राथमिक, माध्यमिक व अंगणवाडी सेविकांनी यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसलिदारांना दिले. 
विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला चंदगड शहरात सर्व व्यवहार बं ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. 
चंदगडसह हलकर्णी, पाटणे फाटा, कोवाड, कोवाड, राजगोळी, शिनोळी, नांदवडे, अडकूर बाजारपेठेत आज दिवसभर शुकशुकाट होता. व्यापारी वर्गानेही बंदमध्ये सहभागी होत संपुर्ण व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरीकांची गैरसोय झाली.  राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या विरोधात व केंद्र सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळावा यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदला कोवाड परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. वाहतूक व जीवनावश्यक वस्तू वगळता शाळा, कॉलेजसह, उद्योग व्यवसाय व शेतीकामे बंद ठेवून सर्वानी बंदला पाठींबा दिला. 
नांदवडे येथेही सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. 
चंदगड येथे उत्स्फुर्तपणे सकाळच्या सत्रात नागरीकांनी येवून सर्व दुकानदारांना आवाहन केले होते.  सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. राजू शेट्टी यांनी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यी वाहतुक करणाऱ्या शालेय बसफेऱ्या चाळीस बसफेऱ्या रद्द झाल्याची माहीती आगार प्रमुख संजय हवालदार यांनी दिली. कोठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र बंद शांततेत पाळण्यात आला. चंदगड, हलकर्णी, कोवाड येथे बँकांही बंद होत्या. त्यामुळे नागरीकांची गैरसोय झाली. चंदगड व कोवाड येथील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. 
कोवाड (ता. चंदगड) येथे सरसकट कर्जमाफी व हमीभावासाठी कोवाड बाजारपेठ बंद ठेवून रास्ता रोको करण्यात आली. यावेळी बोलताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील.
                                    सरसकट कर्जमाफीसाठी कोवाड येथील बाजारपेठ कडकडीत बंद
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या विरोधात व केंद्र सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळावा यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदला कोवाड परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. वाहतूक व जीवनावश्यक वस्तू वगळता शाळा, कॉलेजसह, उद्योग व्यवसाय व शेतीकामे बंद ठेवून सर्वानी बंदला पाठींबा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदला पाठींबा देण्यासाठी कोवाड, कुदनूर, माणगांव व राजगोळी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रा. दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावागावातील कार्यकत्यांनी बंदसाठी आवाहन केले होते. 
                                                     चंदगड तालुक्यात कडकडीत बंद 

शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असून प्रामाणीक शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक असल्याने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेती मालाला हमीभाव मिळावा. या प्रमुख मागण्यांची शासनाने दखल घ्यावी, यासाठी संघटनेने आज बंदची हाक दिली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी गावागावातून मोटरसायकलवरून बंदसाठी सर्वाना आवाहन केले. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या वातावरणामुळे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही सोडण्यात आले. सकाळी ११ वाजता कोवाड बाजारपेठेतील नवीन पुलाजवळ कार्यकर्त्यांनी रस्यावर ठिय्या मारुन रास्तारोको केला. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, जय जवान, जय किसान अशा घोषणानी परिसर दुमदुमला. अचानक रास्तारोको केल्याने वाहतूकीची कोंडी आली. पोलीस यावर नियंत्रण ठेवून होते. यावेळी प्रा. दिपक पाटील म्हणाले, " राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावर ती अन्यायकारक आहे. संपूर्ण सात बारा कोरा करुन शेतीमध्ये पायाभूत सुविधा दिल्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही. पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. सरसकट कर्जमाफी हाच त्यावरचा उपाय आहे." दुंडगे गावचे सरपंच राजू पाटील म्हणाले, " केंद्र शासनाने शेती मालाला हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तो मिळत नाही. राज्य शासनाने हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच कर्जमाफीचा निर्णय मागे घेऊन सरसकट कर्जमाफी करावी, अन्यथा शेतकरी स्वस्थ बसणार नाही. यावेळी एम. एन. पाटील, आप्पा वांद्रे, संजय कुट्रे, जनार्दन देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत आंदोलनाचा लढ चालू ठेवण्याचा निर्धार केला. डॉ. ए. एस. जांभळे, गोपाळ जाधव, सुरेश वांद्रे, निंगाप्पा मोटूरे, सुधीर जाधव, नागनाथ पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment