देशसेवेसाठी युवकांनी सैन्यात दाखल व्हा - माजी सैनिक शंकर पाटील, दाटे येथे "पत्रकार दिन"उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2020

देशसेवेसाठी युवकांनी सैन्यात दाखल व्हा - माजी सैनिक शंकर पाटील, दाटे येथे "पत्रकार दिन"उत्साहात

 दाटे (ता. चंदगड) येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी सैनिक शंकर पाटील व पत्रकार मित्र.
चंदगड / प्रतिनिधी
आई वडिलांची सेवा केल्याने जे समाधान मिळते तेच समाधान देश सेवा केल्याने मिळते,त्यामुळे यूवकानी सैन्यात दाखल होऊन माता आणि मातृभूमिचे रक्षण करावे असे आवाहन माजी सैनिक शंकर पाटील यांनी केले. दाटे (ता. चंदगड) येथे चंदगड तालूका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे अध्यक्षस्थानी होते.
पत्रकार संघाच्या वतीने माजी सैनिक शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 
प्रारंभी भारतीय वृतपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचर्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सैनिक शंकर पाटील,अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य  उदयकूमार देशपांडे यानी करून 25 वर्षापूर्वी स्थापन झालेला पत्रकार संघाची आज समाजात वेगळी ओळख आहे.भविष्यात संघाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचे सागितले.माजी सैनिक पाटील पूढे म्हणाले 40 रू पगारात सैन्यात नोकरी केली.तीन यूध्दात भाग घेऊन उत्तम कामगिरी केलेला सैनिक आहे.त्यावेळी सैन्यात कमी पगार मिळत होता  म्हणून नाराज नव्हतो.कारण मनात देश सेवा करण्याची प्रबळ इच्छा होती.देशांच्या सीमा सूरक्षित असतील तर देशांतील नागरिक  सुरक्षित राहतील. त्यामुळे युवकांनी देश सेवेची ऊर्मी अंगी बाळगून सैन्यात भरती व्हा असे आवाहन केले.  
दाटे (ता. चंदगड) येथे पत्रकार दिन कार्यक्रमावेळी उपस्थित पत्रकार.
संस्थापक सदस्य अनिल धुपदाळे यानी पत्रकार संघाची वाटचाल रौप्य महोत्सवी वर्षाकडे सूरू झाली आहे.  लोकोपयोगी कामाचा वसा यापुढेही सूरू राहणार असल्याचे सांगितले.तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे यानी दर्पणकार जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन संघटनेच्या भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली.चंदगड लाईव्ह चे संपादक संपत पाटील यानी सीएल लाईव्ह चॅनलचा आढावा सादर केला. यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, राजेंद्र शिवनगेकर, संजय पाटील, एस. के. पाटील, लक्ष्मण आढाव, प्रकाश ऐनापूरे, संजय बसापूरे, रवळनाथ भादुर्गे, संदीप तारीहाळकर, प्रदीप पाटील, तातोबा पाटील आदी पत्रकार उपस्थित होते.


1 comment:

Post a Comment