![]() |
अविनाश माने |
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकपदाचा भार अविनाश माने यांनी नुकताच स्विकारला. येथील स.पो.नि. प्रविण पाटील यांची बदली कोल्हापूरला झाल्याने त्यांच्या जागी जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. अविनाश माने यांची नियूक्ती करण्यात आली. श्री. माने यांनी यापूर्वी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे १९ वर्षे अतिशय उल्लेखनीय अशी सेवा केली आहे. नेसरी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणार असून कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशा इशारा स.पो.नि. श्री. माने यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment