फाटकवाडी प्रकल्प दुरूस्तीचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी कृती समितीचे तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

05 May 2020

फाटकवाडी प्रकल्प दुरूस्तीचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी कृती समितीचे तहसिलदारांना निवेदन

फाटकवाडी (ता. चंदगड) येथील प्रकल्पाची गेल्या पावसाळ्यात खचलेली हिच ती भिंत धोकादायक स्थितीत आहे.  
चंदगड / प्रतिनिधी
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्यातील फाटकवाडी येथील प्रकल्पाची सांडव्याकडील बाजु खचली व संरक्षण भिंत कोसळली होती.  त्यामुळे प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या गावांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. हि भिंत पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे गरजेचे असताना त्याकडे अद्यापही दुर्लक्ष असल्याने फाटकवाडी प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी. या आशयाचे निवेदन संघर्ष कृती समितीच्या वतीने तहसिलदार विनोद रणवरे यांना दिले आहे. 
प्रकल्पाला धोका निर्माण झाल्यानंतर भितीने नदी काठावरील लोकांचे स्तलांतर करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाचे आवश्यक दुरूस्तीचे काम संबंधित खात्याने अद्यापही केले नाही. सद्या या कामावर टेंडर झाल्याचे समजते. परंतु हे काम पावसाच्या आधी होणे गरजेचे आहे. यावर्षी ही पाऊस शंभर टक्यापेक्षा जास्त असल्याने भविष्य़ात नदीकाठच्या गावांना मोठा धोका आहे. त्यामुळे या विषयी संबंधित खात्याला  काम सुरू करण्यास आदेश करावा असे निवेदन कृती समितीच्या वतीने तहसिलदार विनोद रणवरे याना देण्यात आले. 

No comments:

Post a Comment