कॉन्स्टेबल आनंदराव देसाई यांच्या धाडसामुळे गुटखा तस्कराला नेसरीजवळ पाठलाग करुन पकडले - चंदगड लाईव्ह न्युज

05 May 2020

कॉन्स्टेबल आनंदराव देसाई यांच्या धाडसामुळे गुटखा तस्कराला नेसरीजवळ पाठलाग करुन पकडले

कागणी : प्रतिनिधी
संकेश्वर परिसरातून गुटखा तस्करी करणाऱ्या नेसरी येथील एका संशयिताला नेसरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल आनंदराव सखाराम देसाई (रा. कागणी) यांनी पाठलाग करुन पकडले.
बेकायदेशीर गुटखा घेऊन जात असताना हुक्केरी व गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवर नेसरी पोलिसांनी नेसरी येथील एकाला पाठलाग करुन पकडले. सदर आरोपी हा रोज संकेश्वर तसेच यमकनमर्डी या परिसरातून बेकायदेशीर गुटखा घेऊन नेसरी, कोवाड परिसरात पुरवठा व विक्री करत होता. शनिवार दि. 22 रोजी या इसमावर पाळत ठेवून दड्डी ते हेबाळ-जलद्याळ या मार्गावर हेळेेवाडी फाट्यावर रंगेहात पकडले. या दरम्यान सदर ईसम पळून जात होता, मात्र देसाई यांनी पाठलाग करुन पकडले. यबाबत पोलीस कॉन्स्टेबल  देसाई यांनी फिर्याद दिली, असून अधिक तपास ए. बी. जाधव करत आहेत. देसाई यांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे कौतुक होत आहे. संकेश्वरसह बेळगाव जिल्ह्यात कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सदर इसम स्वतःचा व  इतरांचा जीव धोक्यात घालून हे कृत्य सुरु ठेवले. संकेश्वर परिसरातून महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने या कलमान्वये त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. 

No comments:

Post a Comment