धामणेसह कोनेवाडीच्या तिघांवर संचारबंदीचे गुन्हे दाखल, चंदगडला ठेवले विलगीकरण कक्षात - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2020

धामणेसह कोनेवाडीच्या तिघांवर संचारबंदीचे गुन्हे दाखल, चंदगडला ठेवले विलगीकरण कक्षात


कागणी : प्रतिनिधि
रात्री-अपरात्री चोरट्या मार्गाने संचार बंदीचे उल्लंघन करुन चंदगड तालुक्यात प्रवेश केल्याप्रकरणी धामणे (ता. बेळगाव) येथील दोन सेंट्रींग कामगारांसह कोनेवाडी (ता. बेळगाव) येथील एका  भाजी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकावर चंदगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यानंतर त्यांना  चंदगड येथे सरकारी विलगीकरणाची कारवाई करण्यात आली आहे.
 कोनेवाडीचा संशयित हा कोनेवाडी येथून पार्ले (ता. चंदगड) येथे भाजी आणण्यासाठी जात असताना देवरवाडी येथे तर धामणे येथील सेंट्रींग कामगार  देवरवाडी येथून महाराष्ट्र हद्दीत पुढे प्रवास करताना पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. देवरवाडीचे पोलीस पाटील जयवंत कांबळे यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथक प्रमुख जमीर मकानदार, डी. एन. पाटील, शशिकांत सुतार यांच्या पथकाने सदर कारवाई केली. अधिक तपास पोलिस नाईक जाधव व गाढवे करत आहेत.

No comments:

Post a Comment