अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कानूर परिसरात घराचे पत्रे उडून संसारोपयोगी साहित्याचे लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2020

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कानूर परिसरात घराचे पत्रे उडून संसारोपयोगी साहित्याचे लाखोंचे नुकसान

वळीव पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कानुर खुर्द (ता. चंदगड) येथे घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कानूरसह परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पाऊस झाला. यावेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे व कौले फुटल्याने पावसाचे पाणी घरात शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. कानुर खुर्दसह पिळणी व भोगोली परिसरात सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. 
गेल्या आठ-दहा दिवसापासून चंदगड तालुक्यात कमी अधिक फरकाने विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. काल दुपारी चंदगड शहरातही रिमझिम पाऊस झाला. मात्र कानुर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या खांबावर पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला होता. कानुर खुर्द येथे 40, पिळणी येथे 50 तर भोगोली येथे 18 घरांचे नुकसान झाले. घटनेची माहीती समजल्यानंतर कानुर खुर्द येथे तहसिलदार विनोद रणवरे, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश फाटक यांनी भेट देवून नुकसानीची पाहणी केली. तलाठी रुपाली कांबळे यांनी सर्व नुकसानीचे पंचनामे केले. यावेळी विभाग प्रमुख सागर पाटील व सरपंच निव्रुती पाटील उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment