मदतीसाठी पॅक केलेल्या जीवनावश्यक वस्तु |
सध्या देशासहित राज्यात कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंदगड तालुक्यातून अनेक स्तरातून मदतीचा ओघ हा सुरूच आहे .रोजंदारीवर असणाऱ्या तसेच निराधार असलेल्या अनेक ठिकाणच्या कुटुंबांना रोजच्या गरजा भागविण्याचा यक्ष प्रश्न सर्वांच्या समोर उभा असताना कुदनूर येथील युवकाकडून कुदनूर-खन्नेटी व किटवाड मधील गरीब तसेच असहाय्य अशा वीस कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणेत आले.
लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली..आर्थिक अडचण अश्यातच निराधार व वयोवृद्ध अश्या लोकांना घरचे व नातेवाईक यांच्याकडून होणारी मदत थांबलेने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे,अशा काही कुटुंबाना सामजिक बांधीलकी जपत मदत व्हावी या जाणिवेतून तांदूळ,आटा,तिखट,तेल,चहा,साखर, डाळ,अंघोळीचा साबण,बिस्कुट इ. जीवनावश्यक वस्तूंच्या 20 किट चे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच कोरोना आजाराची माहिती देऊन जनजागृती ही केली. मागील वर्षी ऑगष्टमधील पुरपरिस्थितीतही असा उपक्रम राबवण्यात आला होता.चंदगडचे शांताराम भिंगडे,पाऊसकर,संतोष गावडे,दीपक वड़ेर,बाळू लोहार,अमर कोले,संतोष नौकुडकर,अनिल आंबेवाडकर,बाळू शहापूरकर,दयानंद रेडेकर,मारुती ओऊळकर,कलाप्पा नागरदळेकर,वैभव कसलकर,मारुती आंबेवाडक,बाळू पाटील,राजू वडर,रवळु परीट,रामा जाधव,सागर पाटील,प्रविण गवेकर,महेश हुक्केरी,सचिन कोकीतकर,विकास होनगेकर,धोंडिबा नौकुडकर,सागर आंबेवाडकर,सनाप्पा कुरबेटी,दयानंद पाटील(किटवाड ) या युवकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला.अशा प्रकारे इथून पुढेही गरजू व्यक्तींच्या कामी येणार असल्याचे युवक वर्गाने सांगितले.त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ खरोखर वाखाणण्याजोगी असून खऱ्या अर्थाने या युवकांनी कोरोनाच्या या युध्यात एक योध्याची भूमिका बजावली आहे. अश्याच प्रकारे अनेक हात हे आज समाजातील विविध स्तरातून एकत्र येण्याची गरज आहे,तरच आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू शकेन.
No comments:
Post a Comment