हुमणीसाठी प्रकाश सापळे लावावेत - ओलमचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2020

हुमणीसाठी प्रकाश सापळे लावावेत - ओलमचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांचे आवाहन

हल्लारवाडी (ता. चंदगड) येथील अनिल पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात असा प्रकाश सापळा लावला आहे. इससेटमध्ये पातेल्यास पडलेले हुमणीचे किडे. 
चंदगड / प्रतिनिधी
ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यानी हुमणीचे भुंगेरे पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा ,असे आवाहन हेमरस साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे
हुमणीच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी केले आहे.  दरवर्षी हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी व जमिनींची खुदाई करून लाखो रुपये खर्च करतो आहे.  पण योग्यवेळी भुंगेरे पकडल्यास हुमणीवर नियंत्रण येऊ शकते. भुंगेऱ्यातून हुमणीच्या अळी तयार होत असल्यानी भुंगेरे पकडण्यासाठी शेतकऱ्यानी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे सांगून शेती अधिकारी पाटील म्हणाले, " सध्या वळीव पाऊस  सुरू असल्याने भुंगेरे पकडण्याची हीच वेळ आहे. सायंकाळच्या वेळी भुंगेरे बाहेर पडतात.  प्रकाश सापळ्यातून भुंगेरे पकडल्यास हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्याला मदत होणार आहे. एका भुंगेरा ऱ्यातून ५० ते ६० हुमणीच्या अळी तयार होतात. त्यामुळे भुंगेरे  पकडणे हाच हुमणीला आळा घालण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.  दोन वर्षांपूर्वी हेमरस साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना हुमणी पकडणारे प्रकाश सापळे दिले होते .अनेक शेतकऱ्यांनी या प्रकाश सापळ्यांचा वापर करून हुमणीवर नियंत्रण आणले आहे. जर प्रकाश सापळे नसतील तर शेतकऱ्यांनी शेताच्या चारी बाजूला बाजूला पाणी घातलेले घमेले ठेवावेत. त्यानंतर त्या घमेल्यातून डिझेल व पेट्रोल घालून त्यावर लाईट लावावा. लाईटच्या प्रकाशाने रात्रीच्या वेळी भुंगेरे त्याकडे आकर्षित होतात व घमेल्यात पडून ते मृत होतात.  हुमणीची आळी लहान असेल तर जैविक कीटकनाशकांचा वापर करावा, असेही आवाहन शेती अधिकारी पाटील यांनी केले आहे.

हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी हुमणी बाधीत क्षेत्रातील सर्वचं शेतकऱ्यानी एकाच कळी भुंगेरे पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर केल्यास हुमणीवर नियंत्रण येऊ शकते असे हेमरसचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment