दौलत साखर कामगार, सभासद व शेतकऱ्यांचा १९ ऑक्टोबरला कारखाना साईटवरील गणपती मंदिर येथे मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2025

दौलत साखर कामगार, सभासद व शेतकऱ्यांचा १९ ऑक्टोबरला कारखाना साईटवरील गणपती मंदिर येथे मेळावा

दौलतचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा   

    दौलत साखर कामगार आणि सभासद व शेतकऱ्यांचा १९ ऑक्टोबर २०२५ रोजी कारखाना साईटवरील गणपती मंदिर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

    दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लीज वर चालवणाऱ्या अथर्व या खाजगी कंपनीने ऊस घातलेले शेतकरी आणि कामगारांची करारानुसार कायदेशीर असलेली देणी न देण्याची ताठर भूमिका घेतली आहे. शेतकरी व कामगारांना व्यवस्थापन केवळ आश्वसने देत आहे. शेतकरी कामगारांच्या प्रलंबित समस्यावर विचार करण्यासाठी चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीने रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता गणेश मंदिर कारखाना साईट येथे कामगार शेतकरी व तोडणी वाहतूकदार यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

    या मेळाव्यास २०१०/११ सिझनमधील मधील शेतकऱ्यांची थकीत देणी, तोडणी वाहतूकदारांची थकीत बिले व ज्या शेतकऱ्यांचे सेवा सोसायटीची कर्जाची रक्कम ऊस बिलातून कपात होऊन देखील ती सोसायटीलाही वर्ग झाली नाही व शेतकऱ्याला ही मिळाली नाही अशा सर्व घटकांनी व २०१९ नंतर निवृत्त झालेल्या पण ग्रॅज्युएटी आणि इतर देणे थकलेले कामगार यांनी उपस्थित रहावे. या मेळाव्यात कायम व हंगामी कामगारांच्या प्रश्नाविषयी पुढील दिशा व विचारविनिमय करण्यात येणार आहे. तरी दौलतच्या सर्व शेतकरी व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे खजिनदार कॉम्रेड प्राध्यापक आबासाहेब चौगुले यांनी केले.

No comments:

Post a Comment