![]() |
इको केन साखर कारखान्याचा १९ वा बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पदाधिकारी. |
तुडीये / सी. एल. वृत्तसेवा
खालसा म्हाळुंगे (ता. चंदगड) इको केन शुगर एनर्जी लिमिटेड कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे कार्यकारी संचालक सतीश अनगोळकर व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. हंगाम सन २०२५ - २६ हंगामासाठी कारखान्याने ५ लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना भागातील शेतकऱ्यांचा शेवटच्या उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना चालू ठेवणार आहे.
कारखान्यावर भागातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यानी खूप प्रेम केलेले आहे. यामुळे मागील प्रत्येक हंगामात उचंकी गाळपाचा विक्रम कारखान्याने केलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या जोरावर कारखाना उच्चंकी असे पाच लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहे. कारखान्याचा यावर्षीचा गाळप हंगाम लवकरच सुरू होत आहे. भागातील इतर कारखान्याच्या बरोबरीत दर देणार असून भागातील व बीड सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा करार बद्ध केली आहे.
यावेळी कार्यकारी संचालक, सतीश अनगोळकर, ए. व्ही. माने – जनरल मॅनेजर, विजयकुमार पाटील – चीफ केमिस्ट, मोहन सासणे – डे चीफ इंजीनियर, नामदेव पाटील – डे चीफ केमिस्ट, सचिन पाटील – मॅनेजर एच आर, नामदेव गुरव – चेअरमन गोलयाळी, भगवंत किरामटे – के डी सी सी गोडाउन कीपर, मधुसूदन कुलगोड – सिविल मॅनेजर, यशवंत गायकवाड – शुगर हमाली कॉन्ट्रॅक्टर, रवींद्र मोहिते - तुडीये व इतर स्टाफ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment