चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघातील लाडक्या बहिणींसाठी चंदगड येथे भव्य भाऊबीज सोहळा आयोजित केला आहे. या भाऊबीज सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा व नेत्या मा.आ.सौ. चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी कार्यालय, ईनाम सावर्डे येथून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली.
![]() |
आमदार शिवाजीराव पाटील |
या प्रसिद्धीकात पुढे दिलेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवार दि २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वा. चंदगड येथील सेंट स्टीफन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मैदानावर भाऊबीज सणानिमित्त आ.शिवाजी पाटील मतदारसंघातील आपल्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. यावेळी उपस्थित महिलांना भाजपा प्रदेशाध्यक्षा मा.आ.सौ.चित्रा वाघ मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित सर्व लाडक्या बहिणींसाठी आ.पाटील यांनी दिवाळी फराळाचे आयोजन देखील केले आहे. या भाऊबीज सोहळ्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींनी उपस्थित रहावे अशी विनंती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment