खुल्या रस्सीखेच स्पर्धेत कालकुंद्री संघ उपविजेता - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2025

खुल्या रस्सीखेच स्पर्धेत कालकुंद्री संघ उपविजेता

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    खास दीपावलीनिमित्त जेलुगडे (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रस्सीखेच टिमने उपविजेते पद पटकावले. यशस्वी संघाला राहुल भरमाण्णा गावडे (सरपंच हलकर्णी), श्रीकांत दळवी, बुधाजी दळवी, नितीन दळवी, श्रीपत गावडे, सोमनाथ गावडे यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले. यशस्वी संघाचे अभिनंदन होत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवणगे तर तृतीय क्रमांक हुंबरवाडी संघाने पटकावला.

No comments:

Post a Comment