चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बेरडवाडा (वरगांव) येथील प्राथमिक शाळेतील ईयत्ता ४ थी मध्ये शिकणारी हुशार विद्यार्थीनी कु.सानवी विजय नाईक या विद्यार्थीनी ला शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक बाबुराव वरपे यानी यानी आपल्या आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त दिपावली चे औचित्य साधून स्वखर्चाने लॅपटॉप भेट मुंबई मंत्रालय येथील अप्पर सचिव सुरेश नाईक यांचे हस्ते कु.सानवी हिला लॅपटॉप भेट देण्यात आला.
कु. सानवी नाईक हिची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे, पण अभ्यासात हुशार असलेल्या सानवीचे शिक्षण आर्थिक अडचणी मुळे थांबु नये म्हणून तिची हुशारी ओळखून मुख्याध्यापक वरपे यांनी तीला स्वखर्चाने हलकर्णी (ता.चंदगड) येथील वेद इन्स्टिट् हलकर्णी (ता.चंदगड) येथे दाखल केले.जून-२०२५ मध्ये झालेल्या एम.एस.सी.आय.टी. परीक्षेत १०० पैकी ७८ गुण घेवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले बद्दल बाबुराव वरपे यांन लेनोवो कंपनीचा मल्टीपर्पज लॅपटॉप दिवाळी भेट म्हणून देवून कौतुक व अभिनंदन करणेत आले.याप्रसंगी तिचे आई-वडील विजय नाईक,सौ.सुमन नाईक, सौ.सुनिता नाईक व नातेवाईक उपस्थित होत.एका गरजू विद्यार्थ्यांनीला शिकण्यासाठी प्रेरित केलेचा आनंद अविस्मरणीय असलेचे मुख्याध्यापक वरपे यांनी सांगितले.यापूर्वीही अशा अनेक गरीब -गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, स्वेटर, स्पोर्ट्स किट,दप्तर, आर्थिक मदत देवून अनेक मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणेचे कार्य मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी गेली बत्तीस वर्षे केले आहे.यांमुळे असे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून उच्चशिक्षण घेवून विविध उच्च पदावर कार्यरत असताना दिसतात..त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल शासन व विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी घेवून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक समाजातून होत आहे.

No comments:
Post a Comment