मलतवाडी येथे पाण्याच्या मोटारींची केबल चोरीला, ९ शेतकऱ्यांना २० लाखांचा फटका - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2025

मलतवाडी येथे पाण्याच्या मोटारींची केबल चोरीला, ९ शेतकऱ्यांना २० लाखांचा फटका


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    मलतवाडी (ता. चंदगड) येथील लघू पाटबंधारे तलावावर शेती पाणी उपशासाठी बसवलेल्या पाण्यांच्या मोटारीच्या केबलवर चोरट्यानी डल्ला मारल्याने  ९ शेतकऱ्यांचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाले आहे.

    येथील तलावावर या पाणी मोटारी बसविण्यात आल्या आहेत . दि १४ रोजी रात्री या सर्व मोटारींची केबल चोरीला गेली असल्याचे  पाहून शेतकरऱ्यांचे धाबे दणाणले. यामध्ये ईश्वर आपाजी पाटील, कुमाना शंकर पाटील, जानबा लक्ष्मण मुर्ढेकर, मायाप्पा इराप्पा कांबळे, सुबराव शंकर पाटील, श्रीकांत सुबराव पाटील, प्रभाकर कृष्णा पाटील, तुकाराम कृष्णा पाटील, शिवाजी बाबू पाटील या नऊ शेतकऱ्यांची १० हजार फूट लांबीची अंदाजे २० लाखांची केबल चोरीला गेली आहे. यासंदर्भात कोवाड पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

कोवाड पोलिसांसमोर आव्हान

    यापूर्वीही निटूर तलाव क्रं १ व २ मधूनही लाखो रुपयांच्या केबल चोरी झाल्या आहेत. पण याचा तपास लागलेला नाही. किटवाड तलावावारील मोटारींच्या केबलही चोरी झाल्या होत्या. या सर्वांचा तपास होऊन गुन्हेगाराना शासन होने गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment