चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय आणि माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. साधन व्यक्ती प्रा. एस. व्ही कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी सातत्याने अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि संस्कृती अशा विविध विषयावर विपुल वाचन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्ती व बुद्धीचा विकास करायला हवा तसेच आपल्या समृद्ध परंपरेचे जतन करायला हवे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी अनेक उत्तम वाचकांची उदाहरणे विशद केली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र .प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी माजी राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जीवनपट उलघडून सांगितला. विद्यार्थ्यांनी जिद्दीचा बळावर संकटावर मात करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. रा. सु. गडकरी यांनी सूत्रसंचालन केले. एन. एस. एस समन्वयक डॉ. एस. डी. गावडे यांनी प्रास्ताविक केले. संविधान उद्देशिकेचे वाचन इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए.डी कांबळे यांनी केले व सामुहिक शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. एन .के पाटील यांनी मांनले. कार्यक्रमांमध्ये प्रा. जी. वाय. कांबळे, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. आर. के. तेलगोटे, प्रा. आर. व्ही. आजरेकर, ग्रंथालय सहकारी व्ही. एम. मुळीक, एम. एम. पिरजादे, अनिल पाटील यांनी सहभाग नोंदवला. एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment