माणगाव येथील जयवंत कुंभार, गजानन कुंभार यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2025

माणगाव येथील जयवंत कुंभार, गजानन कुंभार यांना मातृशोक



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        माणगाव (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतच्या माजी  सदस्या व दिवंगत शिक्षक हनुमंत कुंभार यांच्या पत्नी सुभद्रा हणमंत कुंभार (वय 88) यांचे रविवार (दि. १९) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.  चंदगड येथील रहिवासी व  केडीसीसी बँकेचे निवृत्त डी. ओ. जयवंत कुंभार व माणगावचे माजी सरपंच, माणकेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, माणकेश्वर सहकारी पतसंस्थेचे संचालक गजानन कुंभार यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवार (दि. २३) रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment