मुंबईस्थित ग्रामस्थांना गावी परतण्याची परवानगी मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना अनिरुद्ध रेडेकर यांनी दिले निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2020

मुंबईस्थित ग्रामस्थांना गावी परतण्याची परवानगी मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना अनिरुद्ध रेडेकर यांनी दिले निवेदन

मुंबईस्थित ग्रामस्थांना गावी परतण्यासाठीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देताना  अनिरुद्ध रेडेकर.
चंदगड/प्रतिनिधी
मुंबई -पुणे येथे शिक्षण आणि नोकरीसाठी असलेल्य ग्रामस्थांना रहाण्याची, जेवणाची गैरसोय होत असल्याने त्यांना आपल्या मुळ गावी येण्यास परवानगी मिळावी. या आशयाचे निवेदन केदारी रेडेकर शिक्षण संस्था उपाध्यक्ष अनिरूध्द रेडेकर यांनी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना दिले. 
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, ``जे लोक गावापासून बाहेर असून फक्त ज्यांची जेवणाची रहाण्याची परवड होत असेल त्यांनाच कायदेशीर परवानगी देण्यात येणार आहे.  त्या लोकानी मुंबईवरून गावी आल्यानंतर घरी न जाता त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा किंवा खाजगी शाळा येथे १४ दिवसांसाठी संस्थात्मक कोरंटाईन ( Institutional qorantine) compalsary करावे लागणार आहे.आणि त्यांच्या सर्व रहाण्याचा आणि जेवणाची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायतीने बघायची आहे. आणि ज्यांच सर्व कुटुंब मुंबई- पुण्यात आहे. त्यांनी येण्याचा विचार करु नये.  जर ते आलेचं तर त्यांना इतरांना बरोबर आपल्या लहान मुलांसह Institutional qurantine व्हावे लागणार आहे.  त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कुटुंबाने येण्याचे टाळावे असे ही  प्रांताधिकारी यांनी सांगितल्याचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांना सी एल न्यूज सी बोलताना सांगितले. 


No comments:

Post a Comment