तिलारी जल विद्युत केंद्राचा ३३ वा वर्धापनदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2020

तिलारी जल विद्युत केंद्राचा ३३ वा वर्धापनदिन साजरा

तिलारी येथे जलविद्युत प्रकल्पाच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर.

 चंदगड/प्रतिनिधी:--- राष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका निभावणार्या तिलारीनगर ता.चंदगड येथे पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या जल विद्यूत केंद्राला कालच ३३वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने जलविद्युत केंद्रात यंत्र सामुग्रीचे पूजन शोसल डिस्टसिंग राखत कार्यकारी अभियंता बी.एम. शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आले
     प्रारंभी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सूरवात झाली. १० ऑक्टोबर १९८६ रोजी शासनाच्या वतीने या प्रकल्पाची सूरवात झाली. तासाला .06 एम. यू. एस. ( तासाला ६० हजार युनिट) इतकी वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचा उभारणीसाठी ४३ कोटी ३६ लाख रूपये इतका खर्च आला होता. आजअखेर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या विद्यूत केंद्रातून सन २०१९/२० या आर्थिक वर्षात  ११२.९२ दश लक्ष युनिट इतकी उच्चांकी वीज निर्मिती झाली आहे.
   शासनाने या जलविद्युत केंद्राचे हस्तांतरण ३० एप्रिल १९८७ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे हस्तांतर केले. अनेक नैसर्गिक आपत्ती मध्ये ही या जलविद्युत केंद्राने खंड न पडता वीज निर्मिती करून देशाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला व्ही. एस. गणाचारी, एम. व्ही
 मोरे,आर एस येवारे, एम. जे. लांबे, जे. जी. तरटे, सौ.डी.के.
पाटील आदींनी सोशल डिस्टन्सींगचा
अंमल करीत कार्यक्रम साधेपणाने  पार पडला.

No comments:

Post a Comment