चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाने कोविड-१९ साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये कै. मा. आमदार नरसिंगराव पाटील यांच्या जयंती निमित्त व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ११,११,१११ रुपयांचा निधी दिला आहे. संघाचे अध्यक्ष व आमदार राजेश पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला.
यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, चंदगडसारख्या दुर्गम भागात कै. आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या आशीर्वादाने शेतकरी केंद्रबिंदू मानून हा संघ सुरू आहे . गेल्या आर्थिक वर्षात संघाची ७० कोटी वार्षिक उलाढाल व एक कोटी ६१ लाखांचा नफा झाला आहे. सामाजिक बांधिलकी मानून नफ्यातून ही तरतूद केली आहे. गेल्यावर्षी झालेल्या महापुरात आणि सध्या सुरू असलेल्या कोरोणा संसर्गाच्या काळातही संघाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . यामुळे त्यांना या आर्थिक वर्षासाठी १६.६६ टक्के बोनस व एक पगार प्रोत्साहनाअर्थ देणार असून सर्वच कामगारांना विमाकवच सुरक्षाही लागू करणार आहे.
No comments:
Post a Comment