लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोवाड बाजारपेठेत शुकशुकाट. |
संजय पाटील ,कोवाड /प्रतिनिधी
जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातला असून भारतासहित राज्यात देखील कोरोणा बाधित रुग्णाचा आकडा हा वाढत चालला आहे.चंदगड तालुक्यातील बऱ्याच गावच्या सीमा बेळगाव जिल्ह्याला लागून आहेत,बेळगाव मधील वाढत्या रुगणांचा आकडा लक्षात घेता संभाव्य धोका ओळखून कर्यात भागातील प्रमुख असलेली कोवाड बाजारपेठ पुढचा निर्णय होईपर्यंत अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्तरीय दक्षता समिती व कोरोना समितीच्या वतीने आज घेण्यात आला.येथे संचार बंदी असून देखील आजूबाजूच्या गावातील काही नागरिक हे वेगवेगळी कारणे दाखवून रस्त्यावर फिरताना दिसत असल्याकारणाने आणि गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांची किराणा,भाजीपाला साहित्य खरेदीच्या कारणाने गर्दी होत आहे. दूध डेअरी व्यतिरिक्त गावामध्ये असलेल्या एकूण 12 मेडिकल्स पैकी चार मेडिकल्स ही चालू राहतील.आता बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
कोवाड पासून अवघ्या 25 किलोमीटर वर असलेल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 28 दिवसात एकूण 68 रुगणांची भर पडली असून याचे येथील नागरिकांनी जराही गांभीर्य घेतले नसल्याचे चित्र बाजारपेठेतील गर्दीवरून आजवर दिसत होते.अनावश्यक गर्दी ही दिवसागणिक वाढतच होती.त्यामुळे हा निर्णय घेणे भाग पडल्याचे कोवाडचे तलाठी दीपक कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी सरपंच अनिता भोगण,उपसरपंच विष्णू आडाव,तंटामुक्त कमिटी अध्यक्ष शंकर पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील,आदम मुल्ला,ग्रामसेवक जी.एल.पाटील,व्यापारी कल्लापा वांद्रे,सचिन गजरे,चंद्रकांत वांद्रे उपस्थित होते.
कर्यात भागात कोवाड ही आजूबाजूच्या खेड्यांसाठीची प्रमुख बाजारपेठ आहे.बँका, किराणा तसेच भाजीपाला साठी गर्दी वाढतच आहे.मागील आठवड्यात कोवाड पोलिसांकडून मास्क न लावता डबल सीट,अनावश्यक फिरणाऱ्या 13 दुचाकी वाहनचालकावर जप्तीची तसेच दंडात्मक कारवाई केली आहे.तरीही काही मुर्दाण्ड लोक रस्त्यावर फिरतच आहेत.असे जर मास्क न लावणे,दुचाकीवरून डबल सीट फिरताना यापुढे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे संकेत यावेळी कोवाड पोलीस स्टेशनचे एएसआय हणमंत नाईक यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment