ग्रामीण भागात घराची कौले शेकारणीच्या कामांना गती - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2020

ग्रामीण भागात घराची कौले शेकारणीच्या कामांना गती

तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
           चंदगड तालूक्यातीत ग्रामिण भागात असणाऱ्या कौलारू घरांच्या  काळ्या खापऱ्या शेकारनिचे काम गतिमान झाले आहे.
           आज चंदगड तालूक्याची शहरीकरणाकडे वाटचाल चालू असली तरी ग्रामिण जीवनाची खरोखरी साक्ष देणारी काळ्या खापऱ्यांची घरे गावोगावी आजही दिसून येतात.आरसीसी घरांच्या जमान्यातही हिच काळ्या खापऱ्यांची घरे आजही ग्रामीण जीवनाची साक्ष देतात. अशी अनेक घरे चंदगड तालूक्यामध्ये आहेत. अशा काळ्या खापऱ्यांच्या घरांची दर वर्षी डागड्रजी करावी लागते. घराच्या छपरावर असणाऱ्या कौलांची  पावसाळ्यापूर्वी दूरूस्ती करणे गरजेचे असते. त्यामूळे तालूक्यातील अनेक गावामध्ये अशा घरांची कौले शेकारणीचे काम जोरात चालू आहे .विशेषतः कुंभार समाजातील कारागीरांचा यामध्ये मोठा हातखंडा आहे. नळे, पास्ट बसवीण्याचे काम ते अगदी सफाईदारपणे करतात. या नळयांची निर्मिती पूर्वी राजगोळी खुर्द येथे मोठ्या प्रमाणात केली जात असे . याबरोबरच कोवाड, किणी, तेऊरवाडी येथेही यांची हातावरच निर्मिती केली जायची. आता स्लॅब, पत्रे  व लाल बिटको कौलांच्या जमान्यात या काळी कौले दूर्मिळ झाली आहेत. मात्र आजही हि कौले वापरुन घरे शेकारली जात आहेत. सद्या अशा मजूरांचा भावही वाढला आहे. पावसाळ्यापूर्वीच घरांच्या शेकारणीचे काम वेगाने चालू असल्याचे चित्र सध्या तरी ग्रामिण भागात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment