दहावी बोर्ड कल- अभिक्षमता चाचणीच्या निकालानुसार सर्वांधिक विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे? - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2020

दहावी बोर्ड कल- अभिक्षमता चाचणीच्या निकालानुसार सर्वांधिक विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे?

तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या १० वी बोर्ड परीक्षेच्या कलमापन व अभिक्षमता चाचणी २०२० चा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आला . यामध्ये   १९ . ३ टक्के विद्यार्थी वर्गाचा सर्वाधिक कल हा गणवेशधारी क्षेत्राकडे दिसून आला.
      राज्यातील २२४७८ माध्यमिक शाळामधील १० वी च्या १५७६९२६ इतक्या विद्यार्थी वर्गाने कल व अभिक्षमता चाचणी मोबाईल व कॉम्प्यूटरद्वारा दिली होती. या चाचणीद्वारे विद्यार्थी वर्गाचा सात क्षेत्रातील कल जाणून घेण्यात आला. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  १० वी बोर्ड परिक्षेचा निकाल लांबणार असला तरी या कल चाचणी निकालामुळे विद्यार्थी वर्गाला पुढील प्रवेश घेण्यासाठी विचार करण्यास वेळ मिळणार आहे.

१ ) कृषी २ ) कला मानव्य -विद्या ३ ) वाणिज्य ४ ) ललित कला  ५ ) आरोग्य व जैविक विज्ञान ६ ) तांत्रिक ७ ) गणवेश धारी सेवा यांचा समावेश होता.  हा कल पुढीलप्रमाणे आहे.
 १ ) १९ .३  % -       
गणवेश धारी सेवा
२ ) १७ .७  % - ललित कला
३ ) २० % - मूलांचा पहिला  प्राधान्य कल गणवेश धारी सेवा क्षेत्र तर १९ .८ % मूलींचा कल ललितकला क्षेत्रामध्ये दिसून आला .
४ ) १६ .८ % विद्यार्थ्यांचा कल
 वाणिज्य क्षेत्राकडेआहे .
५ ) १६ .१ % क्षेत्र मलांचे तांत्रीक क्षेत्र आणि १६ % वाणिज्य ही दुसरी प्राधान्य असलेली सेवा क्षेत्रे आहे
६ ) महाराष्ट्रातील ९ विभागापैकी ६ विभागामध्ये गणवेश धारी सेवा तर २ विभागामध्ये ललीत कला यामध्ये प्राधान्य दिले आहे .
७ ) महाराष्ट्रातील ९ विभागापैकी ८ विभागामध्ये वाणिज्य या क्षेत्राला  सगळ्यात जास्त दुसऱ्या क्रमांकाचा कल दिसून आला आहे.
No comments:

Post a Comment