संचारबंदीचा भंग, कल्लेहोळच्या एकावर गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2020

संचारबंदीचा भंग, कल्लेहोळच्या एकावर गुन्हा


कागणी : प्रतिनिधी
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी असताना या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील एक तरुणावर चंदगड पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला शासकीय विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सदर इसम बुधवार दि. 29 रोजी शिनोळी बुद्रुक येथून कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथे चार चाकी वाहनासह बटाटा खरेदीसाठी जात असताना पकडण्यात आले. त्याच्याकड़े केवळ कर्नाटक राज्यात भाजीपाला ने-आन करण्याचा परवाना होता. मात्र चोरट्या मार्गाने त्याने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला. याबाबत शिनोळी बुद्रुकच्या पोलीस पाटील सुधा जत्ती यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस नाईक जमीर मकानदार करत आहेत. सदर इसमावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच कोविड 2020 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चंदगड येथे आरोग्य खात्यातर्फे आरक्षित करण्यात आलेल्या एका हायस्कूलमध्ये विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. गत काही दिवसापासून कोनेवाडी ते देवरवाडी या चोरट्या मार्गाने दुचाकीवरून काही नागरिक येत असल्याचे निदर्शनास येत आहे.  त्यामुळे सदरचा मार्ग पोलिसांनी शुक्रवारी बंद केला. तसेच सीमेवरील सर्वच गावांमधून कडक बंदोबस्त असून चोवीस तास गस्त सुरु असल्याचे पेट्रोलिंग पथक प्रमुख जमीर मकानदार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment