चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील पुणे व मुंबईतील नागरीकांना तपासणी करुन गावी पाठवावे - अनिरुध्द रेडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2020

चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील पुणे व मुंबईतील नागरीकांना तपासणी करुन गावी पाठवावे - अनिरुध्द रेडेकर

तिन्ही तालुक्यातील पुणे व मुंबईतील नागरीकांना तपासणी करुन गावी पाठवावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना देताना अनिरुध्द रेडेकर
चंदगड /  प्रतिनिधी:
चंदगड, आजरा व गडहिंग्लज भागातील मुंबईकरांना योग्य ती तपासणी करून गावी आणावे. या आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना केदारी रेडेकर मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष  अनिरुद्ध रेडेकर यांनी दिले आहे. मुंबईतील ग्रामस्थांच्या अडचणी पालकमंत्री यांच्या लक्षात आणुन दिल्यानंतर लवकरच याबाबत शासन निर्णय घेईल अशा प्रकारचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी  अनिरुद्ध रेडेकर यांना दिले.


No comments:

Post a Comment